जालन्यात रावसाहेब दानवेंना विलास औताडेंचे तगडे आव्हान २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Foto

निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात २३ एप्रिल रोजी जालना लोकसभेसाठी मतदान होईल. या निवडणुकीत जालन्यातून एकूण २० उमेदवार मैदानात उतरले आहेत. परंतु मुख्य लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्येच होणार आहे. भाजपने विद्यमान खासदार रावसाहेब दानवेंना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. तर काँग्रेसने विलासराव औताडेंना पुन्हा एकदा संधी दिली आहे. आता या दोघांमध्ये बाजी कोण मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दानवेंपुढे विजयी परंपरा कायम राखण्याचे आव्हान
जालन्यातून भाजपचे विद्यमान खासदार रावसाहेब दानवेंसाठी २०१९ लोकसभा निवडणुकीत विजयाची परंपरा कायम राखणे आव्हानात्मक आहे. कारण, यावेळी काँग्रेस या मतदारसंघातील पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना निवडणुकीतील मुद्दे बनवून जनतेवर प्रभाव टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. जालन्याला भाजपचा बालेकिल्ला समजले जाते. १९९९ पासून रावसाहेब दानवेच येथून विजयी होत आलेले आहेत. तर काँग्रेस उमेदवार औताडेंनी जालना मतदारसंघातून १९९१ मध्ये शेवटचा विजय मिळवला होता. यामुळे येथे पुन्हा एकदा काँग्रेस आणि भाजपत कांटे की टक्कर मानली जात आहे. जालना मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतदान होईल. यानंतर बरोबर एका महिन्याने २३ मे रोजी निकाल येतील.

जालन्याच्या ६ विधानसभांची स्थिती
जालना लोकसभेंतर्गत ६ मतदारसंघ येतात. यातील पैठण आणि जालन्यात शिवसेनेचा कब्जा आहे. तर बदनापूर, भोकरदन, फुलंब्री मतदारसंघात भाजप आणि सिल्लोडवर काँग्रेसचा ताबा आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker